बँकेचे सर्व अर्ज कसा लिहायचा । Bank arj format in Marathi

मित्रांनो आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी बँक अर्ज घेऊन आलोत‌ बँकेला वेगवेगळ्या कारणांसाठी अर्ज करण्याची आवश्यकता भासत असते. त्यामुळे आजचा या लेखाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कारणासाठी बँक अर्ज फॉर्मेट कशा प्रकारे लिहिला जातो ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
चला तर मग पाहूया, Bank arj in Marathi format

The strength of age: at 96, she started weight training dumbell swuats flexibility, stretching, strength and bodybuilding.

बँकेचे सर्व अर्ज कसा लिहायचा । Bank arj format in Marathi

1. Bank Passbook arj format in Marathi

मित्रांनो जर तुम्ही बँक मध्ये नव्हते अकाउंट ओपन केले असेल आणि तुम्हाला तुमच्या खात्यात संबंधित सर्व व्यवहार पहायचे असेल तर आपल्याला पासबुकची आवश्यकता भासते परंतु आपल्याला माहिती नसते की बँकेमधून पासबुक व कसे घेतले जाते किंवा पासबुक मिळवण्यासाठी बँकेला कशाप्रकारे अर्ज केला जातो.

तर मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की बँक मधून मिळवण्यासाठी आपल्याला बँक मॅनेजर ला अर्ज करावा लागतो आणि आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बँक पासबुक अर्ज फॉरमॅट सांगणार आहोत तो पुढील प्रमाणे आहे.

प्रति,
मा. शाखा अधिकारी साहेब / बँक मॅनेजर
तालुका – तासगाव, जिल्हा – सांगली,
दिनांक १-१-२०२०

अर्जदाराचे नाव – रमेश श्रीमंत सेठ

विषय – नवीन पासबुक मिळण्याबाबत…..

(Account number- 0000713923)

वरील विषयाला अनुसरून मी, रमेश श्रीमंत शेठ आपणास सविनय अर्ज सादर करतो कि, मी आपल्या बँक ऑफ इंडिया चा खातेदार असून माझा खाता क्रमांक ( Account number – 0000713923 ) असा आहे. मला माझ्या या खात्याचे पासबुक अजून देखील मिळालेले नाही.

तरी मी आपल्याला विनंती अर्ज करतो कि मला माझ्या खात्याचे बँक पासबुक लवकरात लवकर देण्यात यावे. मी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँके मध्ये खाते ओपन करत आहे माझ्या लगतच्या शाखेमध्ये जी डॉक्युमेंट ची प्रत दिली होती ती मी या अर्जासोबत जोडत आहे. तरी आपल्याला माझी विनंती आहे की मला माझ्या बँकेचे पासबुक लवकरात लवकर देण्यात यावे.

आपला खातेधारक,
रमेश सेठ

2. Bank statement Arj format in Marathi

मित्रांनो जर तुमचे एखाद्या बँकेमध्ये अकाऊंट असेल तर तुम्हाला कधीनाकधी बँक स्टेटमेंट आवशक्यता नक्कीच भासते. बँकेचे स्टेटमेंट हे आपल्याला प्रत्यक्ष बँकेमध्ये जाऊन काढावे लागते परंतु जर तुम्ही पण काढण्यासाठी बँकेत गेला असेल तर तेथील अधिकारी तुम्हाला बँक स्टेटमेंट साठी अर्ज लिहून मागतात.

त्यामुळे तुम्हाला देखील बँक स्टेटमेंट काढायचे आहे आणि त्या साठी अर्ज कसा लिहितात हे माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला बँक स्टेटमेंट अर्ज फॉरमॅट मराठीमध्ये सांगणार आहोत तो पुढीलप्रमाणे आहे-

प्रति,
मा. शाखा अधिकारी साहेब / बँक मॅनेजर
तालुका – तासगाव, जिल्हा – सांगली,
दिनांक १-२-२०२०

अर्जदाराचे नाव – गजानन श्रीनिवास तांबिले

विषय – माझ्या बँक खात्याचे स्टेटमेंट मिळण्याबाबत…..

( Account Number- 0000713823 )

( जानेवारी महिन्याचे बँक स्टेटमेंट )

वरील विषयाला अनुसरून मी, गजानन श्रीनिवास तांबिले आपणास सविनय अर्ज सादर करतो कि, मी आपल्या बँक ऑफ इंडिया चा ( शाखा – तासगाव सुपर मार्केट) खातेदार असून माझा खाते क्रमांक (Account number- 0000713823) असा आहे. तरी माझे आपल्या शाखेमध्ये सेविंग खाते आहे.

मला माझ्या या खात्याचे काही वैयक्तिक करणासाठी माझ्या या खात्याचा व्यवहार पहायचा आहे. त्यासाठी या खात्याचा मला मागील ( जानेवारी महिन्याचे बँक स्टेटमेंट ) दिनांक :- १-१-२०२० ते ३०-१-२०२० तारखे पर्यन्त चे स्टेटमेंट ची गरज आहे. तरी मला स्टेटमेंट देण्यात यावी हि नम्र विनंती.

आपला खातेधारक,
गजानन तांबिले

3. Bank account band karnyasati arj format in Marathi बँक अकाउंट बंद करण्यासाठी अर्ज

मित्रांनो जर काही कारणामुळे तुम्हाला तुमचे बँक अकाउंट बंद करायचे आहे. आणि जर तुम्ही बँकेमध्ये जाऊन बँक अकाउंट बंद करण्यासाठी सांगतात तेव्हा तेथील मॅनेजर तुम्हाला अर्ज लिहून देण्यासाठी सांगतात. त्यामुळे बँक अकाउंट बंद करण्यासाठी देखील तुम्हाला अर्ज कशा प्रकारे लिहावा लागतो हे माहिती असणे खूप गरजेचे आहे. म्हणून आजच्या मालिका च्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी बँक अकाउंट बंद करण्यासाठी अर्ज फॉरमॅट मराठीमध्ये घेऊन आलो तो पुढीलप्रमाणे आहे-

प्रति,
मा. शाखा अधिकारी साहेब / बँक मॅनेजर
तालुका – तासगाव, जिल्हा – सांगली,
दिनांक १-२-२०२०

अर्जदाराचे नाव – गजानन श्रीनिवास तांबिले

विषय – बँक खाते बंद करण्याबाबत…..

(Account number- 0000713823)

वरील विषयी विनंती पूर्वक अर्ज सादर करतो की, माझे आपल्या बँक ऑफ इंडिया चा खातेदार असून माझा खाते क्रमांक ( Accountnumber- 0000713823 )

आहे, तरी मी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत झालेलो आहे. त्यामुळे येथून पुढे येत मला आपल्या बँक खात्यामध्ये कसल्याही प्रकारचे व्यवहार करता येणार माझे बँक खाते बंद करावे ही विनंती.

तरी माननीय महोदय साहेबांनी माझ्या बँक खात्यात असलेली रक्कम मला देऊन, माझे बँक खाते बंद करावे हि माझी नम्र विनंती.

आपला खातेधारक,
गजानन तांबिले

4. कर्जासाठी बँकेला विनंती पत्र, Karjasathi Bankela Vinanti Arj format in Marathi

बँकांमधून आपल्याला व्यवहारांसाठी, उद्योगधंद्यांसाठी, शेतीसाठी आणि अन्य कोणत्याही कारणासाठी सहजरीत्या कर्ज मेहता तुम्हाला देखील मित्रांनो मधून कर्ज हवे असेल तर प्रथम तुम्हाला बँकेला विनंती पत्र किंवा अर्ज करावा लागतो. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी कर्जासाठी बँकेला विनंती अर्ज घेऊन आलोत जो पुढील प्रमाणे आहे :

प्रति,
मा. शाखा अधिकारी साहेब / बँक मॅनेजर
तालुका – तासगाव, जिल्हा – सांगली,
दिनांक-१-2-२०२०

अर्जदाराचे नाव- विक्रम सुरेश सातपुते

विषय- bank कर्ज मिळण्याबाबत…..

(Account number- 0000713823)

वरील विषयी विनंती पूर्वक अर्ज सादर करतो की, माझे आपल्या बँक ऑफ इंडिया चा खातेदार असून माझा खाते क्रमांक ( Account Number – 0000713823 ) आहे,

आपल्या निदर्शनात ही बाब आणण्यास मला प्रसन्नता होते की, आमच्या क्रीडा संबधित सामग्रीचा व्यवसाय आता खूप वाढला आहे.आता आवश्कतेप्रमाणे सामग्री उपलब्ध करणे गरजेचे असते.पण माझ्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीत सामग्री उत्पादन मोठ्या प्रमाणात होत नाही.

तरी मोठ्या विनम्रतेने आपल्याला विनंती करतो की उत्पादन खर्चाच्या ४० % रक्कमेचे कर्ज जर आपल्या बँकेतर्फे मंजूर झाले तर खूप सुविधा होईल.

आपल्या सकारात्मक उत्तराची अपेक्षा राहील.तसेच बँकेचं कर्जा संबंधी माहिती आणि व्याजकर याब्बदल सर्व सूचना देखील पाठवावे.

आपला खातेदार,
विक्रम सातपुते

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” बँकेचे सर्व अर्ज कसा लिहायचा । Bank arj format in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :